नवी मुंबईतील पांडवकडा धबधब्यावर नो एन्ट्री, पोलिसांकडून नाकाबंदी, 2 तरुण गेले वाहून

नवी मुंबईतील खारघर परिसरातील प्रसिद्ध पांडवकडा धबधब्यावर विकेंडचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली आहे. विशेष म्हणजे, याच धबधब्यावरून शनिवारी दोन तरुण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली होती. या दोघांचा अजूनही शोध लागलेला नाही. असं असतानाही पर्यटकांनी पांडवकडा धबधब्यावर गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, संभाव्य धोका ओळखून नवी मुंबई पोलिसांनी पर्यटकांना धबधब्यापर्यंत जाण्यास पूर्णपणे मज्जाव केला आहे.
