पावसाचा रेड अलर्ट! महापौरांचे मुंबईकरांना आवाहन, झाडांपासून दूर राहा, रितू तावडे आणखी काय म्हणाल्या?

0
image
Spread the love

मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली असून हवामान खात्याने शहरात ‘रेड अलर्ट’ (Red Alert) जारी केला आहे. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी झाडे आणि फांद्या कोसळण्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी मुंबईकरांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचे आवाहन केले आहे. “आपली सुरक्षितता हीच माझी प्राथमिकता आहे,” असे म्हणत महापौरांनी नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. आपल्या व्हिडीओ संदेशमध्ये रितू तावडे यांनी मुंबईकरांना झाडांपासून दूर राहण्यास सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *